विजया एकादशीला १२ पैकी कोणत्या राशींना मिळणार सुख, समृद्धी अन् वैभव
Vijay Ekadashi 2025 Today Horoscope : २४ फेब्रुवारी रोजी माघ कृष्ण पक्षातील विजय एकादशी आणि सोमवार आहे. ही एकादशी तिथी सोमवारी दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत राहील. तर २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजून ५ मिनिटांपर्यंत सिद्ध योग राहील. सिद्धी योगात कोणत्याही कामाची सुरुवात केल्यास निश्चितपणे यश मिळते असे मानले जाते. यासह सोमवारी सायंकाळी ६ वाजून ५९ मिनिटांपर्यंत पूर्वाषाढा नक्षत्र जागृत असेल. पूर्वाषाढा नक्षत्र हे आकाशात असलेल्या २७ नक्षत्रांपैकी २० वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी शुक्राचार्य आहे.