फक्त १ लाख रुपयात लॉंच होऊ शकते ‘ही’ इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर मिळेल १९२ किमीची रेंज
देशात आता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने लाँच होत आहेत. नवीन मॉडेल्स कार मार्केटमध्ये येत आहेत. तसंच भारतात अनेक इलेक्ट्रिक कार आहेत ज्या बजेट रेंजमध्ये उपलब्ध आहेत, तथापि आता सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Ligier Mini EV लवकरच देशात लॉंच केली जाऊ शकते. या इलेक्ट्रिक कारची किंमत फक्त १ लाख रुपये असू शकते असा दावा केला जात आहे. या कारच्या लॉंचनंतर या प्रकरणात किती तथ्य आहे हे समोर येईल, सध्या ग्राहक या इलेक्ट्रिक कारची वाट पाहत आहेत.