दिवाळीत सीएनजी कार घेताय? ‘या’ आहेत बजेटमधील टॉप १० सीएनजी कार्स
दिवाळीत जर तुम्हाला कार खरेदी करायची असेल, तर तुमची मोठी बचत होईल. कार खरेदी करताना पैसे कसे वाचवायचे हे ऐकून तुम्हाला थोडेसे विचित्र वाटेल; पण पेट्रोल-डिझेलऐवजी तुम्ही स्वत:साठी सीएनजी, इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड कार खरेदी करता तेव्हा ही गोष्ट खरी होऊ शकते. मात्र, आता तुम्ही असेही म्हणाल की, या गाड्या जास्त महाग असतात. पण काही सीएनजी कार्स अशा आहेत की, ज्या पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा जास्त महाग नाहीत आणि त्यांची रनिंग कॉस्टदेखील कमी आहे.