होळीचा रंग बाईकच्या ‘या’ पार्ट्समध्ये गेला तर होऊ शकतं मोठं नुकसान
पुढील आठवड्यात म्हणजेच १४ मार्च रोजी देशभरात रंगांचा सण, होळी साजरी केली जाईल. हा सण एकमेकांना रंग लावून सगळे साजरे करतात. पण, अशा वेळेस लोकांना हे कळत नाही की, नकळत त्यांच्या महागड्या वस्तूंनाही रंग लागले जातात. त्यापैकी सर्वांत सामान्य म्हणजे बाईक. रंग खेळताना लोकांना हे कळत नाही की, त्यांच्यासह त्यांच्या बाईकलाही नकळत रंगपंचमीत सामील व्हावे लागते. अशा परिस्थितीत जर होळीचा रंग तुमच्या बाईकच्या काही भागांवर लागला, तर तो तुमच्या वाहनासाठी हानिकारक ठरू शकतो.