पार्किंग करताना कार खालीच कोसळली! गाडी पार्क करण्याआधी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
Car Parking Crash Video: सगळ्यात दुर्लक्षित ड्रायव्हिंग स्किल काय आहे? तर गर्दीच्या रस्त्यावर समांतर पार्क करण्याची क्षमता, असं अनेकांचं म्हणण असेल. परंतु खरं सांगायचं झालं, तर फक्त ‘पार्किंग’ हेच मूळ ड्रायव्हिंग स्किल आहे. सुमारे १.४ अब्ज लोकसंख्या असलेल्या देशात, स्क्रॅच-फ्री कार पाहणं हे युनिकॉर्न शोधण्याइतके दुर्मीळ आहे. अशा सगळ्या घटनांपासून शिकून आपलं कौशल्य वाढवण्याऐवजी आपण फक्त म्हणतो की, असं तर नेहमीच घडत राहतं.