मारुती, टाटाची उडाली झोप! Kiaची ‘ही’ कॉम्पॅक्ट SUV होतेय लॉंच
किआ आपली पुढील कॉम्पॅक्ट SUV Kia Syros १९ डिसेंबर रोजी भारतात लाँच करणार आहे. आधी कंपनीचा Sonet हा एकमेव कॉम्पॅक्ट सेग्मेंट असायचा; पण आता या सेग्मेंटमध्ये Syros चं नाव समाविष्ट होणार आहे. ही SUV लाँच होण्यापूर्वी त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊ या…
किआ इंडिया कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेग्मेंटमध्ये एक शक्तिशाली प्रॉडक्ट म्हणून Syros लाँच करणार आहे. जास्तीत जास्त केबिन स्पेससाठी, फ्लॅट रूफ व बॉक्सी डिझाइन या कारमध्ये दिसू शकते.