बाकी कंपन्यांची उडाली झोप! पॅनोरॅमिक सनरूफ, ६ एअरबॅग्स अन्…, Kiaची एसयूव्ही झाली लाँच
Kia Syros launched: दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी Kia ने काल १९ डिसेंबर रोजी अधिकृतपणे आपली नवीन कॉम्पॅक्ट SUV Kia Syros भारतीय बाजारात लाँच केली आहे. ही एक मध्यम आकाराची बी-सेगमेंट एसयूव्ही आहे, जी सेल्टोस आणि सोनेट यांच्यामधल्या रेंजमधील असेल. मार्केटमध्ये ही एसयूव्ही टाटा पंच, नेक्सॉन, मारुती ब्रेझा, ह्युंदाई एक्सेंट यांसारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करील. सध्या कंपनीने फक्त ही SUV प्रदर्शित केली आहे; पण तिच्या किमती अजून जाहीर केलेल्या नाहीत.