जर तुम्ही तीन दिवस फोन वापरला नाही, तर मेंदूवर काय परिणाम होईल? तज्ज्ञ सांगतात…
स्मार्टफोनच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याचा वापर खूपच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही दशकांमध्ये स्मार्टफोनच्या या अतिवापरामुळे होणाऱ्या विपरीत अशा शारीरिक, सामाजिक व मानसिक परिणामांवर चर्चा केली जात आहे. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का, जर तुम्ही काही दिवस स्मार्टफोन वापरणे थांबवले, तर काय होईल? ‘कॉम्प्युटर्स इन ह्युमन बिहेवियर’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासातून स्मार्टफोन वापरणाऱ्या २५ तरुणांवर ७२ तास स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घालण्याचे परिणाम तपासण्यात आले.