आता चर्चा तर होणारच! मारुती सुझुकीची नवीन जनरेशनची ही कार झाली लॉंच, ६ एअरबॅग्सची सुरक्षा
New-gen Maruti Suzuki Dzire Tour S launched: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतीय बाजारात त्यांच्या प्रसिद्ध सेडान कार मारुती डिझायरचे तिसऱ्या जनरेशनचे मॉडेल लाँच केले. पूर्णपणे नवीन लूक आणि मोठ्या बदलांसह सादर केलेली ही सेडान त्यावेळी फक्त खाजगी खरेदीदारांनाच ऑफर करण्यात आली होती. आता कंपनीने नवीन मारुती डिझायरची नवीन टूर एस आवृत्ती लाँच केली आहे, जी टॅक्सी/कॅब आणि फ्लीट सर्व्हिससाठी उपलब्ध असेल.