टाटाने केलं मार्केट जाम! ‘या’ इलेक्ट्रिक कारवर तब्बल ७०,००० हजारांची सूट
Tata Punch EV Discount: एकीकडे, भारतीय कार बाजारात, कारच्या किमती वाढत आहेत, तर दुसरीकडे, विक्री वाढवण्यासाठी कारवर सवलत देण्याचे प्रयत्नदेखील सुरू आहेत. मारुती सुझुकीपासून ते टाटा मोटर्सपर्यंतच्या गाड्यांवर खूप चांगल्या सवलती आहेत. आता अशा परिस्थितीत, जर तुम्ही या महिन्यात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी खूप चांगली ठरू शकते. टाटाने फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांच्या इलेक्ट्रिक कार पंच EVवर ७०,००० रुपयांपर्यंत सूट दिली आहे. या कारची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊया…