टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स
जपानी कार निर्माता कंपनी टोयोटाने आज अधिकृतपणे त्यांच्या प्रसिद्ध लक्झरी सेडान कार टोयोटा कॅमरीचे नवव्या जनरेशनचे नवीन मॉडेल भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी लाँच केले आहे. कंपनीने नवीन टोयोटा कॅमरी ४८ लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत सादर केली आहे. ही कार सुमारे एक वर्षापूर्वी जागतिक बाजारपेठेत लाँच झाली होती, आता ती भारतीय बाजारपेठेत पोहोचली आहे. कंपनीने या कारमध्ये लेटेस्ट जनरेशन हायब्रीड तंत्रज्ञान वापरले आहे.