जगातील पहिली उडणारी कार! अमेरिकेन कंपनीने शेअर केला VIDEO, किंमत एकदा वाचाच…
World’s first flying car: चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या उडत्या गाड्या प्रत्यक्षातही असू शकतात, असा विचार तुमच्या मनात कधी डोकावलाय का? पण, स्वप्नवत वाटणारी ही बाब आता प्रत्यक्षात उतरली आहे. अमेरिकेच्या अलेफ एरोनॉटिक्स (Alef Aeronautics) कंपनीने जगातील पहिल्या उडत्या कार मॉडेल झिरोचा (Model Zero) व्हिडीओ शेअर केला आहे. ही गाडी हवेत उडताना दिसते. ही कार eVTOL (इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ अॅण्ड लँडिंग) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, म्हणजेच ती रनवेशिवाय सरळ वर टेकऑफ करू शकते.