Video: आमिर खानला भेटून रडत निघाली लेक आयरा, नेटकरी म्हणाले…
बॉलीवूड अभिनेता आमिर खानने ६० व्या वर्षी पुन्हा प्रेमात पडल्याची बातमी शेअर केली. त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची ओळख माध्यमांशी करून दिली. त्याचवेळी, आमिरची लेक आयरा खानचा रडवेला व्हिडीओ समोर आला आहे. आयराच्या व्हिडीओवर चाहत्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. गौरी ही बंगळुरूची असून आमिर खान प्रॉडक्शनमध्ये काम करते. आमिर व गौरी दीड वर्षापासून डेट करत आहेत.