पहलगाम हल्ल्यानंतर फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाबद्दल सरकारचा मोठा निर्णय
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या 'अबीर गुलाल' चित्रपटाला विरोध होत आहे. सोशल मीडियावर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. फवाद खान व वाणी कपूर यांच्या या चित्रपटाला अनेक चित्रपटगृहांनीही बहिष्कार टाकला आहे.