अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभक्तीची गोडी लावणारा ‘भारत’ काळाच्या पडद्याआड
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन झालं आहे. ८७ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. देशभक्तीवर आधारित चित्रपटांसाठी ओळखले जाणारे मनोज कुमार 'भारत कुमार' म्हणून प्रसिद्ध होते. 'उपकार', 'क्रांती', 'पूरब और पश्चिम' यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी अभिनय केला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टी हळहळली आहे. त्यांना नॅशनल अवॉर्ड, पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.