विक्रांत मॅसीच्या भावाने स्वीकारलाय इस्लाम; तर आई-वडीलही पाळतात वेगवेगळे धर्म, वाचा…
बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅसीने अभिनयातून ब्रेक घेतल्याची घोषणा केली आहे. त्याचे शेवटचे चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होतील. विक्रांतच्या कुटुंबातील धार्मिक विविधतेबद्दल त्याने खुलासा केला आहे. त्याचे वडील ख्रिश्चन, आई शीख, भाऊ इस्लाम धर्माचे पालन करतो, तर पत्नी हिंदू आहे. विक्रांतने सांगितले की, त्याचे कुटुंब सर्व धर्मांचा आदर करते आणि सण एकत्र साजरे करते.