बॉलीवूड अभिनेत्रीच्या घरात शेहनाजने केली चोरी, तब्बल ३४ लाखांचे दागिने लंपास
मॉडेल व अभिनेत्री नेहा मलिकने पोलीस तक्रार दाखल केली आहे. तिच्या अंधेरी पश्चिम येथील फ्लॅटमधून ३४.४९ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. २५ एप्रिल २०२५ रोजी ही घटना घडली. अंबोली पोलिसांनी नेहाच्या मदतनीस शहनाज शेखवर गुन्हा दाखल केला आहे. शहनाजने नेहाच्या आईचे दागिने चोरी केले. पोलीस सध्या शहनाजचा शोध घेत आहेत.