फिट राहण्यासाठी रकुल प्रीत सिंग काय करते? तिनेच सांगितला डाएट प्लॅन
बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती नियमित व्यायाम करते आणि आहाराकडे विशेष लक्ष देते. एका मुलाखतीत तिने तिचा डाएट प्लॅन सांगितला. तिच्या दिवसाची सुरुवात गरम पाण्याने होते, त्यानंतर दालचिनीचे पाणी, बदाम, अक्रोड आणि तूप कॉफी घेते. नाश्त्यात अंडी व पोहे, दुपारच्या जेवणात भात किंवा ज्वारीची भाकर, मासे किंवा चिकन, आणि रात्रीच्या जेवणात कमी कार्बोदकं असलेले पदार्थ असतात.