ऐश्वर्या रायचा अपघात पाहून झोपू शकले नव्हते अमिताभ बच्चन; म्हणालेले, “मी तिच्या आईला…”
ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन यांची सून, अभिषेक बच्चनशी लग्न करण्याआधी 'मोहब्बतें' आणि 'खाकी' चित्रपटांमध्ये अमिताभ यांच्यासोबत काम करत होती. 'खाकी'च्या सेटवर झालेल्या अपघातात ऐश्वर्या गंभीर जखमी झाली होती. हा प्रसंग पाहून अमिताभ बच्चन खूप चिंतेत होते आणि दोन रात्री झोपू शकले नव्हते. त्यांनी ऐश्वर्याच्या उपचारासाठी खासगी विमानाची सोय केली होती. २००४ मध्ये 'खाकी' रिलीज झाला आणि तीन वर्षांनी ऐश्वर्या-अभिषेकचे लग्न झाले.