ऐश्वर्या राय बच्चनचा आई अन् लेकीबरोबरचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “तीन पिढ्या…”
बच्चन कुटुंबाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान, ते दोघेही लेकीच्या शाळेत एकत्र दिसले. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अॅन्युअल डे सेलिब्रेशनसाठी ते हजर होते. ऐश्वर्या, तिची आई वृंदा राय व आराध्या एकत्र पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या. ऐश्वर्याच्या आदर्श सून, मुलगी व आई म्हणून कौतुक होत आहे.