दुआ लिपाने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये शाहरुखच्या चाहत्यांना दिलं जबरदस्त सरप्राइज, पाहा व्हिडीओ
जगप्रसिद्ध गायकांचे नेहमी मुंबईत लाइव्ह कॉन्सर्ट होतं असतात. या लाइव्ह कॉन्सर्टला अनेक सेलिब्रिटी उपस्थिती लावतात. नुकताच जगप्रसिद्ध गायिका दुआ लिपाचा मुंबईत लाइव्ह कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टला सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनी खास हजेरी लावली होती. यावेळी उद्योगपती मुकेश अंबानींची धाकटी सून राधिका अंबानी, ईशा अंबानी पाहायला मिळाली. दुआ लिपाच्या लाइव्ह कॉन्सर्टमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.