तमन्नाशी ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान विजयने रिलेशनशिपची आईस्क्रीमशी केली तुलना, म्हणाला…
अभिनेता विजय वर्मा गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. विजयचा तमन्ना भाटियाशी ब्रेकअप झाल्याची चर्चा होत आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवरील विजयबरोबरचे फोटो डिलीट केल्यापासून दोघांमध्ये बिनसलं असल्याचं म्हटलं जात आहे. पण, काही दिवसांआधी विजय व तमन्ना एकाच ठिकाणी धुलीवंदन साजरी करताना दिसले. रवीना टंडनच्या घरी धूळवड खेळतानाचे विजय व तमन्नाचे फोटो व्हायरल झाले होते. अशातच विजय वर्माने रिलेशनशिपसंबंधित केलेलं वक्तव्य सध्या खूप चर्चेत आलं आहे. अभिनेत्याने रिलेशनशिपची तुलना आइस्क्रीमशी केली आहे.