“मूर्ख आणि बिनडोक…”, अमिताभ बच्चन कोणावर भडकले? म्हणाले, “अर्धवट बुद्धी…”
महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांनी खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना खडे बोल सुनावत, अशा लोकांना मूर्ख म्हटलं आहे. त्यांनी Tumblr वर पोस्ट शेअर करत, खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर टीका केली. एक्सवरही त्यांनी पोस्ट करत, खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर निशाणा साधला. खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना त्यांनी मूर्ख व बिनडोक म्हटलंय.