“मी जातोय…”, अमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट पाहून चाहते चिंतेत
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांनी अलीकडेच फेसबुकवर "मी जातोय, चला" अशी चार शब्दांची पोस्ट केली आहे, ज्यामुळे चाहते गोंधळले आहेत. यापूर्वीही त्यांनी "आता जायची वेळ झाली" अशी पोस्ट केली होती, ज्यामुळे चाहते काळजीत पडले होते. त्यांच्या पोस्टवर विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. अमिताभ बच्चन शेवटचे 'कल्की 2898 एडी' चित्रपटात दिसले होते.