एक पारशी, एक मुस्लीम, एक शीख आणि एका हिंदूचे निधन…; अमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट
अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि त्यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे जी चर्चेत आहे. या पोस्टमध्ये २०२४ मध्ये निधन झालेल्या रतन टाटा, श्याम बेनेगल, झाकीर हुसेन आणि मनमोहन सिंग यांचे फोटो आहेत. त्यांनी हे व्यंगचित्र शेअर करत 'हे चित्र सगळं सांगतंय,' असं लिहिलं आहे. युजर्सनी या पोस्टचं खूप कौतुक केलं असून, एकतेचा संदेश मिळतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे.