“आमचा घटस्फोट झालेला नाही”, विभक्त होण्याच्या घोषणेनंतर एआर रहमान यांच्या पत्नीचा खुलासा
ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांना डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आता त्यांची प्रकृती सुधारली आहे. त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी व्हॉइस नोटद्वारे सांगितले की, रहमान यांची अँजिओग्राफी करण्यात आली असून ते ठीक आहेत. सायराने स्पष्ट केले की त्यांचा घटस्फोट झालेला नाही आणि ते अजूनही पती-पत्नी आहेत. रहमान रमजानच्या उपवासामुळे डिहायड्रेशन झाले असावे.