Video: मुलाच्या लग्नात मराठमोळ्या दिग्दर्शकाचा पारंपरिक अंदाज, गांधी टोपीतील लूकची चर्चा
बॉलीवूड दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा मुलगा कोणार्क गोवारीकरचा विवाह सोहळा मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला. कोणार्कने गर्लफ्रेंड नियती कनकियाशी पारंपरिक मराठी पद्धतीने लग्न केले. या सोहळ्यात बॉलीवूड आणि उद्योग जगतातील अनेक दिग्गज उपस्थित होते. आशुतोष गोवारीकर यांनी मुलाच्या लग्नात मनसोक्त नाच केला. नियती कनकिया ही रिअल इस्टेट डेव्हलपर रसेश कनकियाची कन्या आहे. कोणार्क सध्या वडिलांसोबत चित्रपट निर्मितीचे बारकावे शिकत आहे.