सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, “मी घाबरलोय कारण…”
अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारीला घरात घुसलेल्या दरोडेखोराने चाकूने हल्ला केला, ज्यात सैफ गंभीर जखमी झाला. रिक्षाचालक भजन सिंहने सैफला तातडीने रुग्णालयात नेले, ज्यामुळे त्याचे कौतुक झाले. मात्र, सततच्या प्रश्नांमुळे भजन सिंह वैतागला आहे. त्याने सांगितले की, लोक वारंवार त्याच घटनेबद्दल विचारतात, ज्यामुळे तो काम आणि झोप व्यवस्थित करू शकत नाही.