“मी एका खांबामागे…”, पत्नीला कर्करोग झाल्याचं समजताच आयुष्मान खुरानाला बसलेला धक्का
अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपला पुन्हा स्तनांचा कर्करोग झाला आहे. २०१८ मध्ये तिला पहिल्यांदा कर्करोगाचे निदान झाले होते आणि उपचारानंतर ती बरी झाली होती. ताहिराने सोशल मीडियावर पोस्टद्वारे ही माहिती दिली. आयुष्मानने ताहिराच्या धैर्याचे कौतुक केले आहे. ताहिरा आणि आयुष्मानची प्रेमकहाणी शालेय जीवनात सुरू झाली होती आणि २००८ मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांना दोन अपत्ये आहेत.