बॉलीवूड अभिनेत्याने सेटवर आलेल्या चाहत्याला का मारलेलं? स्वतःच केला खुलासा
गोविंदाच्या चाहत्याला मारलेल्या झापड प्रकरणी २००८ मध्ये वाद निर्माण झाला होता. संतोष राय नावाच्या चाहत्याने सेटवर गैरवर्तन केल्याने गोविंदाने त्याला झापड मारली होती. संतोषने गोविंदाकडून ३-४ कोटी रुपये मागितले होते. ९ वर्षे खटला चालला आणि शेवटी गोविंदाने स्टिंग ऑपरेशनद्वारे संतोषचे वक्तव्य कोर्टात सादर केले. २०१७ मध्ये गोविंदाने दिलगिरी व्यक्त केली आणि प्रकरण मिटले. आता गोविंदा तीन नवीन चित्रपटांसह पुनरागमन करतोय.