कार्तिक आर्यन ११ वर्षांनी लहान अभिनेत्रीला करतोय डेट? अभिनेत्याच्या आईने दिली हिंट
‘आयफा पुरस्कार २०२५’ सोहळ्यात कार्तिक आर्यनने करण जोहरबरोबर सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली होती. यावेळी कार्तिकला ‘भूल भुलैया ३’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात कार्तिकच्या आईने भावी सूनेविषयी भाष्य केलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.