न्यू इअरचं सेलिब्रेशन करून रणबीर-आलिया राहासह मुंबईत परतले, एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल
बॉलीवूडचे अनेक कलाकार २०२५ या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी परदेशात गेले होते. अभिषेक बच्चनपासून ते हृतिक रोशनसह अशा बऱ्याच कलाकारांनी परदेशात नव्या वर्षाचं स्वागत केलं. शनिवारी, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन लेक आराध्यासह मुंबईत परतले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता कपूर कुटुंबदेखील नवीन वर्ष साजरं करून मुंबईत परतलं आहे. याचे फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत.