दिग्गज अभिनेत्रीची नात, एका गाण्याने बनली स्टार; सलग १२ फ्लॉप चित्रपट, MMS लीक झाला अन्…
९० च्या दशकात 'याद पिया की आने लगी' या गाण्याने रिया सेन घराघरात प्रसिद्ध झाली. तिचं चित्रपटसृष्टीतील पदार्पण 'स्टाइल' या चित्रपटातून झालं, पण सलग १२ फ्लॉप चित्रपटांमुळे तिचं करिअर संपलं. वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिलेल्या रियाचं नाव जॉन अब्राहम, युवराज सिंग यांच्याशी जोडलं गेलं. अखेर तिने २०१७ मध्ये शिवम तिवारीशी लग्न केलं. रिया एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना आणि योग शिक्षक आहे.