Video: “माणुसकी अजून जिवंत आहे”, बॉलीवूड अभिनेत्रीच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं
सध्या कडाक्याच्या थंडीत गरजू लोकांना मदत करण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने स्वेटर व अन्नाचे वाटप केले आहे. तिच्या या कृतीचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. विद्या बालनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्या शेवटची 'भूल भुलैय्या 3' चित्रपटात दिसली होती, ज्याने बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींहून जास्त कमाई केली होती.