३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक मसाबा गुप्ता तीन महिन्यांपूर्वी आई झाली. मसाबा व तिचा पती सत्यदीप मिश्रा यांनी ११ ऑक्टोबर २०२४ रोजी मुलीला जन्म दिला. मसाबाने मुलीचं नाव 'मतारा' ठेवलं असून, त्याचा अर्थ नऊ हिंदू देवींच्या दैवी स्त्री शक्तींचे प्रतीक आहे. मसाबाने इन्स्टाग्रामवर मताराच्या नावाचं ब्रेसलेट घातलेला फोटो पोस्ट केला आहे.