बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार, दीड वर्षांचा आहे मोठा मुलगा
बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझ पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर मिडनाइट स्नॅक्सचा फोटो शेअर करत 'तुम्ही प्रेग्नंट आहेस हे न सांगता सांगा' असे कॅप्शन दिले आहे. यापूर्वीही तिने दुसऱ्या प्रेग्नेंसीचे संकेत दिले होते. इलियाना आणि तिचा पती मायकल डोलन यांना ऑगस्ट २०२३ मध्ये पहिलं बाळ झालं होतं. इलियाना अखेरची 'दो और दो प्यार' चित्रपटात दिसली होती.