श्रद्धा कपूरने जुहूमध्ये भाड्याने घेतलं आलिशान अपार्टमेंट, महिन्याचं भाडं ऐकून व्हाल थक्क
गेल्या १५ वर्षांपासून श्रद्धा कपूर आपल्या दमदार अभिनयाने बॉलीवूडवर अधिराज्य गाजवत आहे. अभिनेते शक्ति कपूर आणि शिवांगी कोल्हापुरी यांची ही लाडकी लेक बॉलीवूडची आघाडी अभिनेत्री झाली आहे. ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘स्त्री २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. ८०० कोटींहून अधिक पैसे कमावणाऱ्या ‘स्त्री २’ चित्रपटाच्या यशाचा आनंद श्रद्धा कपूर घेत आहे. अशातच तिने जुहूमध्ये आलिशान महागडं अपार्टमेंट भाड्याने घेतल्याचं समोर आलं आहे.