Video: रॅम्प वॉक करताना अचानक सोनम कपूर ढसाढसा रडू लागली, नेमकं काय झालं? जाणून घ्या…
‘सावरिया’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी सोनम कपूरने आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. ‘सावरिया’ चित्रपटानंतर सोनम ‘दिल्ली ६’, ‘आयशा’, ‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘प्लेयर्स’, ‘रांझणा’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘निर्जा’, ‘संजू’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकली. सोनमचा अभिनयाचा जितका चाहता वर्ग आहे, तितकाच तिच्या सौंदर्याचा, फॅशन सेन्सचा चाहता वर्ग आहे. सध्या सोनमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप होत आहे. ज्यामध्ये ती अचानक रॅम्प वॉक करताना ढसाढसा रडताना दिसत आहे. यावेळी नेमकं काय झालं? जाणून घ्या…