उदित नारायण यांनी भारतरत्न मिळण्याची इच्छा केली व्यक्त, व्हायरल व्हिडीओबाबत म्हणाले…
दिग्गज गायक उदित नारायण खूप चर्चेत आहेत. उदित नारायण यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते लाइव्ह कॉन्सर्टमध्ये काही महिलांच्या गालावर, तर काही जणींच्या ओठांवर चुंबन घेताना दिसत आहे. त्यामुळे उदित नारायण यांच्यावर सध्या टीकास्त्र होतं आहे. अशातच दुसऱ्या बाजूला उदित नारायण यांनी भारतरत्न मिळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसंच व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत “मला कसलाही पश्चाताप झाला नाही”, असं वक्तव्य उदित नारायण यांनी केलं आहे.