३५० कोटींचे बजेट अन् कमावले फक्त…; बायकोचा सिनेमा ब्लॉकबस्टर, तर नवऱ्याचा ठरला सुपरफ्लॉप
२०२४ हे वर्ष भारतीय सिनेसृष्टीसाठी चांगलं ठरलं. ज्योतिका आणि सूर्या या सेलिब्रिटी जोडप्याच्या चित्रपटांमध्ये विरोधाभास दिसला. ज्योतिका हिचा 'शैतान' सिनेमा सुपरहिट ठरला आणि बॉक्स ऑफिसवर २१३.८ कोटींची कमाई केली. तर सूर्या याचा 'कंगुवा' चित्रपट ३५० कोटींच्या बजेटवर फ्लॉप ठरला आणि फक्त १०५.२ कोटींची कमाई करू शकला.