Chhaava : ‘छावा’ची ग्रँड ओपनिंग! विकी कौशलच्या सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले तब्बल…
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपट, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित, अखेर प्रदर्शित झाला आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना भारावून टाकले आहे. पहिल्या दिवशी 'छावा'ने ३१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावरही कौतुक होत आहे.