‘छावा’ चित्रपटाची १६व्या दिवशीही जबरदस्त कमाई, आतापर्यंत ‘इतक्या’ कोटींचा जमवला गल्ला
Chhaava Box Office Collection Day 16: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘छावा’ चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. अजूनही प्रेक्षक विकी कौशलचा ‘छावा’ बघण्यासाठी गर्दी करत आहेत. नुकताच देशांतर्गत ‘छावा’ चित्रपटाने ४०० कोटींचा टप्पा पार केला. ५०० कोटींच्या क्लबमध्ये अवघ्या काही दिवसांत ‘छावा’ची एन्ट्री होणार आहे. १६व्या दिवशी विकी कौशलच्या या बहुचर्चित चित्रपटाने किती कमाई केली? जाणून घ्या…