‘छावा’ चित्रपटाची अजूनही घोडदौड सुरुच, २३व्या दिवशी केली ‘इतकी’ कमाई
Chhaava box office collection Day 23: विकी कौशल, रश्मिका मंदाना यांचा ‘छावा’ चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर जबदरस्त कमाई करत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाला २० दिवसांनंतरही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपट हा २०२५ मधला ५०० कोटींहून अधिक कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. २३व्या दिवशीदेखील ‘छावा’ चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे.