Chhaava: ‘छावा’च्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घसरण, सिनेमाचे एकूण कलेक्शन ‘इतके’ कोटी!
'छावा' चित्रपटाने चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने भारतात १४५ कोटी आणि जगभरात १६५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाचे बजेट १३० कोटी असून, प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चौथ्या दिवशी चित्रपटाने २४ कोटींची कमाई केली आहे.