Chhaava: ४० व्या दिवशी ‘छावा’ची कोटींमध्ये कमाई, चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन किती? वाचा…
विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला 'छावा' चित्रपट सहा आठवड्यांपासून प्रदर्शित आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित हा चित्रपट २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. ४० व्या दिवशी चित्रपटाने दीड कोटींची कमाई केली असून एकूण कलेक्शन ५८६.३५ कोटी रुपये झाले आहे. 'छावा'ने अनेक विक्रम मोडले आहेत. विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना आणि मराठी कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.