Chhaava: ‘छावा’ची प्रेक्षकांमध्ये क्रेझ! चित्रपटाने एका आठवड्यात किती कमाई केली? वाचा…
विकी कौशलच्या मुख्य भूमिकेत असलेला 'छावा' चित्रपट, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथेवर आधारित आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. पहिल्या आठवड्यात 'छावा'ने २२५.६८ कोटी रुपयांची कमाई केली. १३० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तीन दिवसांतच बजेट वसूल केले. विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.