Chhaava: ‘छावा’ची क्रेझ कायम! एका आठवड्याचे कलेक्शन तब्बल ‘इतके’ कोटी
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटाने प्रदर्शित होऊन आठवडा झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित हा चित्रपट सातत्याने दमदार कमाई करत आहे. आठव्या दिवशी 'छावा'ने सुमारे २३ कोटींची कमाई केली असून, भारतात एकूण २४२.२५ कोटी आणि जागतिक स्तरावर ३५० कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षकांचा उत्साह अद्याप कायम आहे.