‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित 'छावा' चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील एक डिलिट केलेला सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सीनमध्ये हंबीरराव मोहिते आणि सोयराबाई यांच्यातील संवाद आहे. अभिनेत्री दिव्या दत्ताने या सीनबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. हा सीन चित्रपटात असता तर आनंद झाला असता, असे तिने म्हटले.