‘छावा’चा क्लायमॅक्स सीन पाहून विनोद करून हसले, ‘त्या’ ५ जणांबरोबर लोकांनी काय केलं? पाहा
'छावा' चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असून, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा प्रवास, लढाया आणि औरंगजेबाने दिलेला त्रास दाखवला आहे. नवी मुंबईतील थिएटरमध्ये क्लायमॅक्स सीनदरम्यान हसल्याबद्दल पाच जणांना माफी मागायला लावण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना प्रमुख भूमिकेत आहेत.