सुपरस्टारच्या लेकीने सलमान खानच्या फार्महाऊसवर घालवले ३ दिवस; म्हणाली, “ते मला जंगलात…”
कन्नड अभिनेता किच्चा सुदीपची मुलगी सान्वीने 'दबंग ३' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानबरोबरच्या आठवणी सांगितल्या. सान्वी १५ वर्षांची असताना वडिलांसोबत शूटिंगला आली होती. सलमानने तिचे खूप लाड केले, तिला गाणं गाण्यास सांगितलं आणि तिचा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी संगीत दिग्दर्शकाला फोन केला. सलमानबरोबर जिम, पोहणे आणि जंगल सफारीचे अनुभव सान्वीने शेअर केले.